जसे पोस्टातून पत्र यायचे तशा इडीच्या नोटिसा यायला लागल्यात
भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला इडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे
सुप्रिया सुळेंचा घणाघात..
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या, या दौऱ्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या इडीच्या कारवाईबद्दल आणि इडी कडून येत असलेल्या नोटीसी बद्दल बोलताना "जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस दिल्या जात आहेत ही आजकाल फॅशन झाली आहे..आधी ज्याप्रमाणे पोस्टातून पत्र यायची त्याप्रमाणे आता इडी कडून नोटिसा यायला लागल्यात'₹" हे या देशाचे दुर्दैव असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या..