Buldana,Fuel इंधन दरवाढ विरोधात मेहकरात युवासेनेची सायकल रँली - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, October 31, 2021

Buldana,Fuel इंधन दरवाढ विरोधात मेहकरात युवासेनेची सायकल रँली



इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली..

राज्याचे पर्यावरण मंत्री Minister of State for Environment तथा युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज केंद्र सरकारच्या अन्यायी पेट्रोल-इंधन दरवाढ विरोधात सायकल भव्य सायकल रॅली व बैल गाडी रॅली सपन्न. युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी प्रतापराव जाधव यांच्या यशस्वी नेतृत्वखाली बुलडाणा जिल्हाभर भव्य सायकल व बैल गाडी रॅली मोठ्या संख्येने सपन्न.


मेहकर केंद्र सरकार कडून सततच्या इंधन दरवाढ विरोधात आज शहरात युवा सेनेच्या वतीने सायकल रँली काढण्यात आली शिवसेना खासदार प्रतापरावराव  जाधव व शिवसेना आमदार डॉ.संजय  रायमुलकर,युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव यांच्या उपस्थितीत ही रँली काढण्यात आली. सततच्या इंधन दरवाढी मुळे सर्व सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या दरवाढीला विरोध म्हणून आज सायकल रँली काढण्यात आली. सकाळी १० वाजता येथील  विश्रामगृहात मेहकर तालुक्यातील युवा सेना पदाधिकारी व युवा सैनिक सायकल सह हजर झाले होते. तेथे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, युवा सेना पदाधिकारी निरज रायमुलकर,युवा सेना तालुका प्रमुख भूषण घोडे,


 

नगरसेवक विकास जोशी,ओम सौभागे,रवि रहाटे,हनिफ गवळी, पिंटू सुर्जन,संजय खंडागळे यांच्या उपस्थितीत शहरातून रँली काढण्यात आली. यावेळी इंधन दरवाढ विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

Post Top Ad

-->