भारतीय लष्करात जनरल बिपिन रावत यांचे मोठे योगदान राजेन्द्र पळसकर
भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे दि 8/12 रोजी हेलिकॉप्टर अपघातात दुख:द निधन झाले त्यांना श्रध्दाजंली अर्पन करतांना भारतीय लष्कारासाठी त्यांचे खुप मोठे योगदान असल्याचे भावपूर्ण मत राजेन्द्र पळसकर यांनी व्यक्त केले
दि 9/12 रोजी डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये स्थानीक शांतता समिती, पोलिस स्टेशन व संजीवनी सेवाभावी परिवार डोणगांव च्या संयुक्त विद्यामाने जनरल बिपिन रावत यांना डोणगांव नगरवासीयांच्या वतिने भावपूर्ण श्रंध्दाजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, या श्रध्दाजंली सभेच्या अध्यक्षस्थानी जि प सभापती राजेन्द्र पळसकर, तर ठाणेदार निलेश अपसुंदे, भा रा काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष शैलेष सावजी,नाझीम कुरेशी, मा सभापती निबांजी पांडव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, डाँ गजानन उल्हामाले, संदीप पांडव, शिवचरण आखाडे,सौ ज्योतीताई बुरखंडे आवर्जुन उपस्थित होते, दिपप्रज्वलन करून स्व जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, प्रास्ताविक मनोगतातुन प्रा गजानन सातपुते यानी त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला,
याप्रसंगी राजेन्द्र पळसकर, ठाणेदार निलेश अपसुंदे, डाँ गजानन उल्हामाले यांनी स्व जनरल बिपिन रावत यांनी आपल्या भारत देशाच्या लष्करासाठी केलेल्या कार्याची, त्यांच्या अर्धागनी स्व सौ मधूरीका रावत यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून या अपघातात निधन झालेल्या अधिकारी यांना श्रंध्दाजली अर्पण केली ,सभेचे सुत्रसंचालन हमीद मुल्लाजी तर आभार डाँ नकुल फुले ,सुरेन्दसिंह चव्हाण यांनी मानले,
या श्रध्दाजंली सभेसाठी शांतता समिती सदस्य मधुकरराव घिरके, अशोकराव वानखेडे, उत्तमराव परमाळे ,अमोल धोटे,अबरार खान मिल्ली, प्रशांत चोपडे, किरण देवकर, शाम इंगळे आसिफ खान, भागवत जाधव, बशीर शाह, जलालखाँ पठाण, मुक्तेश्वर काळदाते, राजेक खान,अरूण धांडे, राजु पुजांनी,आकाश बाजड, सुभाष अढाव सह पोलीस कर्मचारी, श्री शिवाजी हायच्या विद्यार्थीनी आवर्जुन उपस्थित होते, राष्टगिताने श्रध्दाजंली सभेची सांगता झाली