पॉझिटिव्ह येणाऱ्यात जास्तीत जास्त प्रमाण शिक्षकांचे.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा आदेश दिला व त्या नंतर शिक्षण २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आदेश काढून शाळा सुरू करण्या संदर्भात आदेश दिले व त्यात शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली त्याने मेहकर तालुक्यातील १७५० च्या जवळपास शिक्षकांनी २५ ते २९ तारखे दरम्यान कोरोना टेस्ट करून घेतली ज्यात तालुक्यातील ४५६ पेक्षा जास्त शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले ज्याने शिक्षण विभागासह जनतेच्या चिंतेत भर पडली जर शिक्षक पॉझिटिव्ह असतील तर इतरांची सुद्धा कोरोना टेस्ट पोजेटीव्ह येऊ शकते फरक इतकाच की शिक्षकांची टेस्ट झाली इतरांची नाही.
शाळा सुरू होण्या अगोदर शिक्षकांची कोरोना आर्टिपीसीआर चाचणी घेणे अनिवार्य असे एक पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने २४ जानेवारी रोजी दिले ज्याने मेहकर तालुक्यातील शिक्षकांनी २५ ते २९ जानेवारी दरम्यान मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट घेतली मेहकर तालुक्यात १ ते १२ परियांतच्या २५२ शाळा असून ५३ हजार ५२३ विध्यार्थी असून त्यावर १७५० शिक्षक शिकवतात यात पैकी ४५६ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
( मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालकांना मिळाल्यावर पालकांनी पाल्याना शाळेत पाठविले नाही ५३ हजार ५२३ पैकी फक्त १२ हजार ९६८ विध्यार्थीच शाळेत गेले होते)
(शिक्षकांची आर्टिपीसीआर रिपोर्ट आल्या पासून समोरील ७ दिवस हे घरात कोरान्टीन राहावे जर लक्षण असतील तर त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधी घ्यावी डॉ विशाल मगर तालुका वैधकीय अधिकारी मेहकर)
( जे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांनी कोरान्टीन प्रेड संपल्या नंतर शाळेत जाण्या पूर्वी रॅपिड टेस्ट करून घेणे गरजेचे आहे ज्याने लहान मुलांच्या आरोग्या विषयी प्रश्न निर्माण होणार नाही - मीनाक्षी बनसोड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा जिल्हा)