सात बारा वर क्षेत्रफळ दुरूस्ती करिता 1350 रुपयांची मागणी.
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील धादरी येथील तलाठीस लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची घटना काल घडली आहे.
तक्रारदार हा सरांडी गावातील असून त्यांच्या वडीलांची नावाने मौजा उमरी येथे शेती आहे.सात बारा वर क्षेत्रफळ दुरूस्ती करिता धादरी तलाठ्याने 1350 रुपयांची मागणी केली होती.
परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.लाचलुचपत विभागाने सापळा रचत काल 15 फेब्रुवारीला पंचासमक्ष 1350 रूपयांची लाच घेताना धादरी येथील तलाठी बालकेश्वरी पटले वय 43 वर्षे व अमोल कापसे 24 वर्षे खाजगी इसम लाच स्वीकारताना यांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. सदर घटनेची नोंद तिरोडा पोलिस स्टेशन करण्यात आली असून लाललुचपत विभागाचे पुरुषोत्तम अहेरकर पोलिस उपअधीक्षक ,सह त्यांच्या टीम ने कारवाई केली आहे.