(Aapala vidarbh live गजानन जाधव मेहकर)
मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे श्री संत गजानन महाराजप्रगट दिनानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक सोहळा करण्यात आला त्यानिमित्त दिनांक 22 रोजी संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला व दिनांक 23 रोजी सकाळी गजानन महाराजांचा सकाळी सात वाजता दुल्हन अभिषेक करण्यात आला व त्यानंतर भव्य दिव्य मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली गावामध्ये महिलांनी आपल्या दारोदारी सडा-सारवण रांगोळी पूजापाठ करून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.गावांमध्ये मिरवणूक झाल्यानंतर गजानन महाराज संस्थान येथे येऊन आरती सोहळा पार पडला व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला गजानन महाराज सेवा समिती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात कार्यक्रम पार पडला गजानन महाराज सेवा समिती व गावकरी मंडळी यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला