वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलसानी लावून दिला प्रेमी युगुलाचा विवाह
प्रेमप्रकरणातून कुटुंबीयांनी प्रखर विरोध दर्शविल्याने प्रेमीयुगुलांनी थेट वाशिमच्या शिरपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रेमीयुगुलांची भावना लक्षात घेता पोलिसांनी पुढाकार घेत या नवदाम्पत्याचे पोलिस ठाण्यातच विवाह लावून दिला.
शिरपूर येथील रहिवासी असलेले गणेश जाधव व शिवाणी मानवतकर या सज्ञान प्रेमीयुगुलाने शिरपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसाकडे अर्ज करून आपली व्यथा मांडली.आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो,आम्हाला लग्न करायचे आहे.परंतु कुटुंबीयाकडून विरोध
होत असल्यामुळे दोघेही सज्ञान असल्याचे त्यांनी शिरपूर पोलिसांनी दोघांची व्यथा ऐकून दोघांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर काही वेळातच या प्रेमीयुगुलाचा विवाह पोलीस ठाण्यात पार पडला. या विवाहाला प्रेमीयुगुलाकडील दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते.प्रेमीयुगुल गणेश आणि शिवाणी लग्नाच्या बेडीत अडकले.