समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, कारला आग लागून दोघांचा भाजून मृत्यू.. तर एकाचा उपचारादरम्यान
(APALA VIDARBH LIVE देवानंद सानप बुलढाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील आज सकाळी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज 305 वर एक भरधाव कार क्रमांक MH 02 CR 1459 ही सुरुवातीला सिमेंटच्या रेलिंग ला धडकून भीषण अपघात झाला. अपघातानंतर कार ला भीषण आग लागली...या कार मधून तीन जण प्रवास करत होते त्यापैकी चालक धक्क्याने बाहेर फेकल्या गेला व जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला
भिषण अपघात कारमधील 3 जणांचा होरपळून मृत्यू
येथे टच करा आणि व्हिडिओ पहा 👆
असून इतर दोघे मात्र आग लागलेल्या कार मध्ये अडकून भाजून मृत्युमुखी पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार मध्ये डिझेलच्या चार ते पाच कॅन भरून डिझेल होते त्यामुळे आग अजूनच वाढली. यातील चालकाने नाव अजय दिनेश भिलाला असून तो मध्यप्रदेशातील शाजापुर येथील आहे तर इतर मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे अद्याप मिळालेली नाही. या कार मध्ये डिझेलच्या कॅन असल्याने मोठी आग लागली असून पोलिसांनी डिझेल चोरीचा संशय व्यक्त केला आहे.त्याप्रमाणे पुढील तपास बीबीचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे ,कलिम देशमुख, अरुण सानप, जैवाळ साहेब करत आहेत,