Apala Vidarbha Live News Network श्रीराम यांचा जन्म स्थळ असलेल्या अयोध्या येथे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथून जवळपास २०० महिला व पुरुष भाविक हे पाईवरी करीत आयोध्या येथे श्रीराम यांच्या जन्मभूमीत पोहोचणार आहेत. श्रीराम यांच्या जन्मभूमीत जाणारी महाराष्ट्रातून ही पहिलीच पायी वारी आहे यामधील प्रत्येक वारीतील सदस्याच्या डोक्यावर भगवी टोपी , हाती भगवा ध्वज व ''श्रीराम राम जय जय राम'' जयघोष प्रमुख आकर्षणाचा विषय ठरतोय.
महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथून दि.२२ मे रोजी निघाली आहे तर दिं. १८ जुन रोजी म्हणजे २७ दिवसांच्या प्रवासाने श्री क्षेत्र श्री राम जन्मभूमी अयोध्या उत्तर प्रदेश येथे पोहचणार आहे.