सोयाबीन, गहू चोरीतील 04 आरोपी पोलीसांच्या जाळ्यात एकूण 05 गुन्ह्यांची कबुली.
स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांच्या पथकाची कारवाई.
बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस स्टेशन चिखली, डोणगांव, मेहकर यांच्या हद्दीमध्ये दाखल सोयाबीन व गहू इत्यादी शेतमाल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक, सुनिल कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते.
सदर अनुशंगाने पोलीस निरीक्षक. अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा- बुलढाणा यांनी संबंधीत गुन्हे उघडकीस आणून, त्यातील आरोपीतांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी अधिनस्त पोलीस पथकांना सुचना दिल्या असता सदर गुन्हे मधील,
दि.30/05/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वस्तुनिष्ठ आणि तांत्रिक पध्दतीने तपास करुन तसेच आरोपीतांची गोपनीय माहिती काढून पोलीस स्टेशन डोणगांव हद्दीत आरोपी (1) शेख कलीम शेख असलम वय 30 वर्षे, रा. मातनी (2) शेख आसीफ शेख करीम वय 23 वर्षे, रा. मातनी (3) शेख तस्लीम उस्मान खान वय 34 वर्षे (4) गणेश महाघू इंगळे वय 40 वर्षे रा. डोणगांव यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. नमुद आरोपींनी पोलीस स्टेशन चिखली, डोणगांव,मेहकर सह अशा एकूण 05 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. नमुद आरोपी यांचे कडून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन क्र. MH-20-BE2493 किं.3,00,000/-रुपये, चार मोटार सायकल किं. 2,00,000/- असा एकूण 5,00,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपी यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन डोणगांव यांच्या ताब्यात अल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून. माहिती मिळाली.
सदर कारवाई सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा, बी. बी. महामुनी- अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. यांचे नेतृत्वात पोहेकॉ.राजकुमार राजपूत, पोहेकॉ. शरद गिरी, पोना. गजानन दराडे, पोना. पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. गजानन गोरले, चालक पोकॉ. रवि भिसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा - बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे.