Apala Vidarbh Live Network
बुलढाणा समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा येथे श्रावस्ती बहुउद्देशीय विकास प्रबोधिनी बुलढाणा संस्थेच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
एसटी बस चालकास मारहाण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखलकोरोना काळामध्ये सर्व व्यवस्थाच कोलमडून पडली होती. त्यामध्ये अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, सर्वांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. यातून आता बऱ्यापैकी सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने संस्थेच्या माध्यमातूनही या कामी हातभार लागावा या उद्देशाने श्रावस्ती बहुद्देशी विकास प्रबोधिनी बुलढाणा या संस्थेने समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा येथे रोजगार व स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी जुने व नवीन बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच या शिबिरा साठी एम एस डब्ल्यू महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर यांचे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. या शिबिरास संस्थेचे अध्यक्ष संदीप सुखधान यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये सुमारे 12 विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, लोणावळा या भागामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्था रोजगार व स्वयंरोजगार या विषयावरही काम करत आहे. यामध्ये गरजूंना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे संधी उपलब्ध करून देणे हे काम सध्या संस्थेने हाती घेतलेले आहे. यामध्ये बचत गट तयार करणे तसेच त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी लागणा-या निधी बाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांनी उत्पादित केलेला मालाची विक्री करणे यासाठी संस्था काम करत आहेत.