Buldhana एसटी बस चालकास मारहाण Marahanaचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, May 31, 2023

Buldhana एसटी बस चालकास मारहाण Marahanaचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Apala Vidarbha Live Network बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे स्थानिक बसथांब्यावर एसटी बस लावण्याच्या कारणावरून बस चालक अजीस खान तस्लिम खान याला चार व्यक्तिंनी मारहाण करीत शासकीय गणवेश फाडल्याची घटना  घडली.

डोणगाव येथील बस थांब्यावर मेहकर येथून बेलगाव जाण्यासाठी एमएच ४०, एन ८२६७ ही बस चालक अजीस खान तस्लिम खान या चालकाने आणल्यानंतर बसथांब्यार बस लावण्याकरिता बसथांब्यासमोर असलेल्या दुचाकीला बाजूला घेण्यासाठी हॉर्न वाजवून इशारा केला. यावेळी दुचाकी घेऊन उभा असलेला गणेश  याने शिवीगाळ करायला सुरवात केली. यावेळी चालकाने शिवीगाळ का करतो, असे विचारले असता  प्रकरण मारहाणीत रुपांतर झाले. यावेळी त्याच्या सोबत असलेले ईतर तीन व्यक्तीनी   सुद्धा मारहाण करण्यात सुरवात केली. यात शासकीय गणवेश फाडला, अशा प्रकारे अजीस खान तस्लिम खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलिसांनी ३५३, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post Top Ad

-->