जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वटार गावात घरगुती गॕस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन घरे जळून खाक झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. आगीने रौद्ररूप धारण करताच शेजारी असलेल्या दोन घरांनी देखील पेट घेतला.
कैलास कोळी यांच्या घरी रात्रीचं जेवण तयार करीत असतांना गॅस नळीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात गॅस हंडीचा स्फोट झाला. या घटनेत कैलास कोळी व सरलाबाई कोळी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ अडावद रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आगीत घरातील संसारोपयोगी सामान जळाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
👉ट्रॅक्टरची व टू व्हीलर ची धडक दोन ठार
तसेच जळगाव व चोपडा येथून अग्निशमन दलातील ३ बंबांच्या मदतीने आगविझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.