रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा जोडेमारो आंदोलन देवानंद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, June 19, 2023

रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा जोडेमारो आंदोलन देवानंद


रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा जोडेमारो आंदोलन
देवानंद सानप यांचा इशारा
बीबी:- गेल्या चार वर्षांपासून कासवगतीने सुरु असलेल्या बीबी ते किनगाव जट्टू मार्गाच्या डांबरीकरण व सिमेंटकरण काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. काम सुरुच असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे वैतागून जात देवानंद आनंदराव सानप यांनी संबंधितांना जोडेमारो आंदोलन व तरीही मार्गाचे काम न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा मुख्यमंत्र्यांना इमेल द्वारे निवेदन देऊन दिला आहे.
सानप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगांव जट्टू ते बिबी सहा किलोमीटर डांबरी व सिमेंट रोडचे काम चार वर्षापासून सुरुच आहे. ते काम अजूनपर्यंत पुर्ण झाले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई व काम करणारे ठेकेदार यांचे जाहिर आभार व अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याखातर जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही समस्या कायम राहिली तर परिसरातील ग्रामस्थ नागरिकांना सोबत घेऊन मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे.
बिबी ते किनगांव जट्टू या रोडचे काम फेब्रुवारी 2020 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्या अंतर्गत सुधीर कंस्ट्रक्शन नागपूर या कंपनीला देण्यात आलेले आहे. आज दिनांक 16 जून 2023 रोजी पर्यंतही काम पूर्ण झालेच नाही. म्हणुन आम्ही कंपनीचे व सरकारचे आभार मानत आहोत.
या रोडवरुन दहा ते पंधरा गावच्या नागरिकांना ये जा करावी लागत आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक याच रोडने जात असतात. त्याचबरोबर श्री. संत गजानन महाराजांची पालखी 18 जुलै 20 23 रोजी याच किनगांव जट्टू मार्गाने लोणार कडे जाणार आहे. खोदून ठेवलेल्या रोडवर दगड, माती, मुरूम, धूळ, आदि गोष्टींचा सामना दररोज शेकडो नागरिकांना करावा लागत आहे.
या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे ढळढळीतपणे दिसत आहे.
तरी देखील सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला व संबंधित ठेकेदार गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
संबंधित ठेकेदारावर अजून पर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. म्हणुन आम्ही परिसरातील शेकडो नागरिक सरकारचे आभार मानत आहे.
चार पाच दिवसात बंद पडलेले काम सुरु करा व निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करा. तसेच संबंधित ठेकेदाराचे लायसन्स काळ्या यादीत टाका, अन्यथा मंत्रालया समोर आमरण उपोषण करणार असुन शेकडो नागरिकांना घेऊन किनगांव जट्टू ते बीबी रोडवर संबंधितांना जोडे मारो आंदोलन करणार असुन यांची संबंधित विभागाने व ठेकेदाराने नोंद घ्यावी.

Post Top Ad

-->