Buldhana,धोंडे धोंडे पाणी दे पावसासाठी उपक्रम.. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, June 19, 2023

Buldhana,धोंडे धोंडे पाणी दे पावसासाठी उपक्रम..


धोंडे धोंडे पाणी दे.
(APAlA VIDARBHA LIVE देवानंद सानप बुलढाणा)
शेतकऱ्यासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे पावसाचे चौदा दिवस उलटून गेले तरीही पाऊस पडायला तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शेतकऱ्याच्या पेरण्या थांबल्या आहेत.
14 दिवस झाले तरीही पाऊस पडत नसल्यामुळे पेरणीचे दिवस निघून चालले आहे त्यामुळे शेतकरी शेती मशागतीची कामे आटपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे मात्र शेतात पाऊस नसल्यामुळे पेरणी थांबली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आनंदी सुखी राहण्यासाठी रामनगर तालुका डिग्रस येथील नाथपंती समाजाचे तानाजी शेगर ,मनोहर शिंदे, मनोहर शितोळे, शिवाजी शेगर, दत्ता शिंदे, सौमी सेगर हे बीबी येथे येऊन उघड्या अंगाला कडुनिंबाची डहाळे बांधून एका बेंडकीला काठीला बांधून धोंडे धोंडे पाणी दे .
पाण्याचे दिवस लवकर येऊ दे. याचकले बेंडकी पाणी बुलाव ,काळा कचरा खोबऱ्याची वाटी ,बेंडकी बांधली पाण्यासाठी ,हनुमान बाबा सत्याचा, पाड बांधला मोत्याचा. असे गीत गाऊन आकाशाला गवसणी घालत होते. लवकर पाऊस पडू दे .बळीराजाला सुखी होऊ दे. अशी प्रार्थना करत असताना गावांमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या बेंडकीवर पाणी टाकून अनेक शेतकऱ्यांनी पूजा केली. आणि त्यामुळे लवकर पाऊस पडेल असेही बोलल्या जात आहे. 
   

Post Top Ad

-->