भरधाव बोलोरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज १९ जून रोजी रिसोड वाशिम मार्गावर नागठाणा जवळ घडली.
तिन्ही मृत रिसोड तालुक्यातील येवती येथील रहिवासी आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही दुचाकी क्रमांक एमएच २१ एके १५६९ ने वाशिमहून आपल्या गावाकडे येत असताना रिसोडहून
वाशिमकडे जाणान्या एमएच ३७टी २६५९ क्रमांकाच्या पिकअपला दुचाकीची धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत पिकअपमधील एकलासपूर तालुका रिसोड येथील गोपाल कुलाळ व बद्री कुलाल हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती
मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस याप्रकरणी कार्यवाही करत होते