मनमर्जीने बियाणे वाटप, शेतकऱ्यांना कोणतीच माहिती दिली नाही.
Buldhana डोणगाव येथे त्रिगोणी चौकात सरकारी बियाणे मिळत आहे चला चला असा संदेश मिळाला जो तो बियान्या साठी जाऊ लागला एकीकडे शेतकऱ्यांना बियाणे वाटप म्हणजे सातबारा घेऊन करायला पाहिजेत होता मात्र येथे कोणतीही पूर्व सूचना न देता आधार कार्ड दाखवा 50 रुपये द्या आणि 8 किलो सोयाबीन बियाणे घेऊन जा या पद्धतीने कित्येक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला व कित्येक गरीब शेतकरी बियान्या पासून वंचित राहिले.
डोणगाव मध्ये 24 जुनच्या संद्याकाळी त्रिगोणी चौकात कृषी विभागा कडून 8 किलो फुले संगम बियाण्याची बॅग पन्नास रुपया मध्ये दिल्या गेली जी वाटपाची पद्धत सुद्धा खूपच वेगळी अशी होती आधार घेऊन या आणि 50 रुपये द्या व बियाणे घेऊन जा अश्यात कित्येक गरजवंत शेतकऱ्यांच्या परियंत ही माहिती पोचलेलीच नसल्याने त्यांना बियाणे मिळू शकले नाही बियाणे वाटपाच्या जागी कोणत्याच प्रकारे नियम नसल्याने कित्येक शेतकरी आपली हिम्मत चालणार नाही म्हणून गर्दीतून काढता पाय घेतला.
बियाणे वाटपाच्या अगोदर गावात माहिती देणे बंधन कारक होते ज्यात कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य होते हे कळणे गरजेचे होते मात्र तसे न होता कोणतीही माहिती न देता 50 रुपये द्या आणि बियाणे घेऊन जा या पद्धतीने बियाणे वाटप करण्यात आले या पद्धतीने सामान्य शेतकऱ्याच्या मनात कृषी विभागा बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली कृषी विभागा कडून हे बियाणे मोफत असल्याचे समजले मात्र डोणगाव मध्ये पैसे घेतल्या गेलेत )