खनिजाच्या नावावर चक्क क्रीडांगणाच्या कामामध्ये वापरण्यात येतो विहिरीतील गाळ नवी मादनी येथील प्रकार
सदर तक्रार मध्ये नमूद नवी मादनी येथील मराठी प्राथमिक शाळेआगे क्रिडांगणामध्ये टाकन्यासाठी घाईगडबडीने रात्रीचे वेळी आनलेले निकृष्ट दर्जाचे खनिज, गाळ तात्काळ रद्द केल्याशिवाय व गुणवत्तापूर्ण मटेरियल (खनिज) असल्याशिवाय काम सुरू करू नये व झालेल्या पहिल्या कामाची यंत्रण - कडून माझेसमोर व पत्रकारांसमोर तात्काळ चौकशी करन्यात यावी, अहवाळाची प्रत मला देण्यात याची अन्यथा आपले कार्यालयासमोर माल नाईलाजाने उपोषण करावे लागेल याची नोंद घ्यावी- अर्जदार भाऊराव वामन जावळे, रा मादणी, यांची तक्रार दाखल.
नवी मादणी येथील मराठी प्राथमिक शाळेमागे क्रिडांगनाचे काम सुरु असुन, ग्राऊंडमध्ये नदीवरचा गाळ, चुनखडी हे कच्चे, निकृष्ठ दर्जाचे खनिज वापरून ठेकेदार प्रमोद दांदडे व मादणीचे सरपंच हे संगनमताने गावक-यांच्या डोक्यात धूळफेक करीत असून, आपले उखळ पांढर करून घेत आहेत. आज 23/06/2023 रोजी रात्री 2 वाजेपासून तर सकाळी 4-20 वाजे. पर्यंत दोन ट्रॅक्टरव्दारे यांनी नदीवरचा व जलजिवन योजनेच्या विहिरीवरून गाळ क्रिडांगणामध्ये आणून टाकला आहे.
सदर क्रिडांगनामध्ये यापूर्वी ही मटेरियल अल्प रापरून आकडे, रक्कम, बिल फुगवून काढले याची प्रथम तात्काळ चौकशी व आजरोजी घाईगडबडीने क्रिडांगणामध्ये टाकन्यासाठी आणलेले कच्चे निकृष्ठ मटेरियल (खनिज) रद्द केल्या गुणवत्तापूर्ण मटेरियल (खनिज) असल्याशिवाय पुढील काम सुरू करू नये, अन्यथा नाईलाजास्तव मला आपल्या कार्याल यासमोर उपोषणास बसावे लागेल व सर्व जबाबदारी आपल्यावरच राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
अशा याची तक्रार गट विकास अधिकारी, तहसिलदार, मेहकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या कडे
माजी सरपंच भाऊराव जावळे यांनी तक्रार दाखल केली आहे