Buldhana सानप यांच्या इशार्‍याची दखल रोडचे काम सुरु - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, June 22, 2023

Buldhana सानप यांच्या इशार्‍याची दखल रोडचे काम सुरु


(APAlA VIDARBHA LIVE देवानंद सानप बुलडाणा)
गेल्या दोन ते तिन वर्षांपासून कासवगतीने सुरु असलेल्या बीबी ते किनगाव जट्टू मार्गाच्या डांबरीकरण व सिमेंटकरण काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. काम सुरुच असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे वैतागून जात देवानंद आनंदराव सानप यांनी दि 16 जून रोजी संबंधितांना जोडेमारो आंदोलनचा व तरीही मार्गाचे काम न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदन देऊन दिला असता सबंधित विभागाने दि 21 जून रोजी काम सुरू केले
सानप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
बिबी ते किनगांव जट्टू या रोडचे काम फेब्रुवारी 2020 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांच्या अंतर्गत सुधीर कंस्ट्रक्शन नागपूर या कंपनीला देण्यात आलेले आहे.परंतू आज पर्यंतही काम पूर्ण झालेच नाही.
या रोडवरुन दहा ते पंधरा गावच्या नागरिकांना ये जा करावी लागत आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक याच रोडने जात असतात. त्याचबरोबर श्री. संत गजानन महाराजांची पालखी 18 जुलै 20 23 रोजी याच किनगांव जट्टू मार्गाने लोणार कडे जाणार आहे. सदर रोड हा खोदून ठेवल्याने रोडवर दगड, माती, मुरूम, धूळ, आदि गोष्टींचा सामना दिंडीतिल वारकर्यांना तसेच दररोज शेकडो नागरिकांना करावा लागत आहे.
या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे ढळढळीतपणे दिसत आहे.
तरी देखील सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला व संबंधित ठेकेदार गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
संबंधित ठेकेदारावर अजून पर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. म्हणुन आम्ही परिसरातील शेकडो नागरिकांनी अंदोलनाचा पवित्रा घेतला होता याचा धसका घेत सबंधीत विभागाने रोडचे काम सुरु केले

कासव गतीने काम सुरु झाले असून बीबी गावातील सिमेंड रोडचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे सदर कामाची चौकशी करून इष्टीमेंड प्रमाणे काम करून हा पालखी मार्ग असल्याने दि 18 जुलै च्या आत काम पूर्ण करण्याची सबंधीत विभागाने नोंद घेण्याची मागणी देवानंद सानप यांनी केली आहे
      ............................................‌‌‌‌

मॉ जानकी एन्टरप्राईजेस एक वेळेस नक्की भेट द्या

Post Top Ad

-->