(छायाचित्र संग्रहित)
डोणगाव ग्रामपंचायतला गाला चेव दिली दवंडी म्हणे 123 मधले अतिक्रमण काढून घ्या हो हो...
(APAlA VIDARBHA LIVE Network)
बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून एक आगळी वेगळी ओळख असलेल्या डोणगाव ग्रामपंचायत अंतर्गत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे जेवढं मोठं या ग्रामपंचायतीचे नाव तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या ई क्लास जमीन मध्ये अतिक्रमण झालेले असून त्यावर पक्की बांधकाम सुद्धा झालेले आहे मात्र ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे दवंडी देऊन म्हणे अतिक्रमण काढून घ्या हो. मात्र कारवाई बघितलं तर शून्य. अश्याच प्रकारे मागील जानेवारी महिन्यात सुध्धा डोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मटन मार्केट मधील अतिक्रमण काढण्यात आले होते मात्र त्या ठिकाणचे अतिक्रमण मोजक्याच लोकांचे काढल्यामुळे नागरिकांची नाराजीचा सूर दिसून आला होता. नेहमीप्रमाणे डोणगाव येथील धनदांडगे नागरिकांनी पक्क्या स्वरूपाचे डोणगाव ग्रामपंचायत ई क्लास गट क्रमांक 123 मध्ये पक्के बांधकाम करून आपले व्यवसाय थाटले असून यावर मात्र ग्रामपंचायत डोणगाव कुठल्याच अतिक्रमणांवर कारवाई करत का नाही की ग्रामपंचायत चिरी मारी करून गप्प बसलेली आहे का असा सवाल आता सुज्ञ नागरिकांमध्ये पडला आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आज दिनांक 08/07/2023 रोजी दिलेली ही दवंडी सुद्धा फोल ठरणार असल्याचे आता सर्वसामान्य जनतेमध्ये बोलल्या जात आहे.