पोलीस प्रशासनात खळबळ..
महिला पोलीस कर्मचारी आणि तिच्या २ वर्षाच्या मुलीची गळा चिरून हत्या करून पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या.. ऐन नागपंचमीच्या दिवशीच घडविले हत्याकांड
बुलढाणा चिखली येथील ३७ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी व तिच्या २ वर्षाच्या मुलीची गळा चिरून हत्या केल्यावर पतीने स्वतःही तालुक्यातील गांगळगाव शिवारात जाऊन आत्महत्या केल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांची ८ वर्षांची मोठी मुलगी शाळेत गेली असल्याने सुदैवाने तिचे प्राण वाचले अशी चर्चा परिसरात आहे. सदर घटना २१ ऑगष्ट च्या सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. घटनेचे कळताच पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, चिखली पोलीस स्टेशन येथे रात्रपाळी कर्तव्य बजावुन पत्नी ला सकाळी ९ वाजता घरी घेऊन आल्यावर पती पत्नी दोघांमधे वादा झाल्याची चर्चा असतांना पतीने घरामधे असलेल्या चाकुने पत्नीसह चिमुकलीवर अनेक वार करुन हत्या केल्याची घटना पंचमुखी महादेव मंदिरा जवळील शाहु नगर मधे दि. २१ ऑगस्ट च्या सकाळी १० वाजता घडली. दोघींची हत्या केल्या नंतर पती किशोर कुटे याने देखील कवठळ येथील गांगलगाव मार्गावर विहिरी मधे आत्महत्या केली.
चिखली येथील महिला पोलीस कर्मचारी वर्षा किशोर कुटे (दंदाले) वय ३६ हया चिखली पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होत्या सकाळी ड्युटी संपल्यावर पती किशोर कुटे त्यांना सकाळी साडे नऊ वाजता घरी घेऊन आला. त्यानंतर त्यांच्या मधे वाद झाल्याचे समोर आले. याच वादातुन त्याने पत्नीवर चाकुने वार केले यामध्ये पत्नीच्या हतावर वार अडवल्याने मोठ्या प्रमाणवर जखमा आढळुन आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची दोन वर्षाची कृष्णाली देखील घरीच होती तिच्या देखील पोटावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड घडविल्या नंतर पती किशोर जनार्दन कुटे याने घरुन दुचाकी क्रमांक एम. एच डब्ल्यू ९९७२ स्कुटी ने जाऊन कवठळ शिवारातील गांगलगाव रस्त्यावर असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मिळून आले. त्याठिकाणी एक स्कुटी सुद्धा आढळून आली. सदर स्कुटी ही मयत वर्षा कुटे यांच्या नावावर होती. सदर माहिती मृतक वर्षाचा भाऊ संतोष ला माहिती पडल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता गळफास घेऊन मयत झालेले त्यांच्या बहिणीचा नवराच असल्याचे कळले. त्यांनी सदर बातमी आपल्या बहिणीला सांगण्यासाठी चिखली येथील एका महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन वर्षा कुटे यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांना वर्षा कुटे (३७ वर्ष) व कु कृष्णा कुटे (२ वर्ष) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या दोघांची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून येत होते. याबाबत त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना काळवल्यावर एकच खळबळ उडाली. तर परीसरातील नागरिकांनी या पती पत्नीस सकाळी १० वाजता ड्युटी संपुन घरी जातांना बघितले होते. तर त्यांची ८ वर्षांची मोठी मुलगी ओवी ही शाळेत गेली असल्याने सुदैवाने ति यामधुन वाचली अशी चर्चा परिसरात आहे.