अमरावती पोलिसांनी पकडला 31 लाखांचा 1 क्विंटल गांजा; गाजांची खेफ मुंबई जाणार होती
(APALA VIDARBH LIVE राज माहोरे: अमरावती)
अमरावती दि. 07/10/2023 रोजी पोलीस आयुक्त सा. यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत अमली पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, रवि मारोडकर हा त्याच्या दोन साथीदारासह इटीका कार क्र. एम.एच. 02 डी. जी. 2911 या कारने अवैधरीत्या गांजा विक्री करणे करीता गांजाची मोठ्या प्रमाणात खेप घेवून अमरावती जुना बायपास ने बडनेरा येथे येणार आहे. व तो सदरचा माल मुंबई येथे पाठविणार आहे. अशी खात्री लायक माहीती प्राप्त झाल्याने नमुद ठिकाणी जावून, बगीया टी पॉईंट येथे जावून इटीका गाडी क्र. एम.एच. 02 डी. जी. 2911 पांढ-या रंगाची येतांना दिसली, सदर गाडीवर पुढे व मागे प्रेस लिहलेले दिसून आले, बरुनु सदर वाहनाचा शिताफीने पाठलाग करून सदरची गाडी थांबविली असता सदर गाडीच्या मागच्या सिटवर ओलसर हिरव्या कळीचा उग्र वासाचा ( झाडपत्ती सारखा दिसणारा ) गांजा वजन प्लॅस्टीक टेप गुंडाळुन पत्नीसह प्रत्येकी गट्ट 5 किलो 400 ग्रॅम वजनाचा असे 20 गट्टू मिळून आले ज्याचे एकुन वजन 1 क्विंटल 8 किलो (108 किलो) गांजा कि.अ. 21,60,000/- रु. मिळुन आला तसेच एक पांढ-या रंगाची सुझुकी इटीका क्र. एम. एच. 02 डी.जी. 2911 कि.अ. 7,00,000/- रु. असा एकुन 28,60,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नाम रवि प्रेमचंद मारोडकर वय 40 वर्ष रा. नांदगाव खंडेश्वर, अनं. यास ताब्यात घेवुन त्याचे विरुद्ध तसेच त्याच्या साथीदारा विरुद्ध कलम 20.22, 29 एन. डी. पी. एम. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला . पुढे तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री सागर पाटील, पोलीस उपायुक्त परि. 1 अम. श्री विक्रम साळी, पोलीस उपायुक्त परि 2 अम. श्री प्रशांत राजे सहा. पो.आयुक्त, गुन्हे शाखा अम. यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु पो.हे.का. सुनिल लासुरकर विनय मोहोड, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो.शि. राहुल डेकर, विनोद काटकर, यांनी केली आहे.