बुलढाणा चरित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या त्या नराधम आरोपीला दि 20 मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 16500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमी जवळ असलेल्या जगदंबा नगरात महिला वय 35 वर्षीय ही आपल्या आई-वडिलांकडे तीन मुलीसह राहत होती. 2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव राहणार जालना याच्यासोबत रीती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सदर लग्न संबंधापासून आरोपी गजानन पासून महिलेला तीन मुली झाल्या आहेत. परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. व शारीरिक व मानसिक छळ सुद्धा करीत होता. महिलेचे वडील सुरेश तायडे हे नेहमी महिला व आरोपी गजानन यांना समज देऊन नांदवयास पाठवत होते. सततच्या त्रासामुळे कंटाळून महिला अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वी दोन मुलीसह माहेरी आली होती. काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला व रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता. 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी व मुलगी ही बुलढाणा मध्ये बाहेर कामानिमित्त गेलेली होती. महिलेच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या. आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा बेत असल्यामुळे त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर दोन चाकूने आठ वार करून तिचा खून केला. व दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये पुढे घेतले. मात्र, त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले. पोलिसांनी आरोपी याला अटक करून जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे आरोपीविरुद्ध खटला सुरू झाला व जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी याला जन्मठेपेची शिक्षा व 16 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोकला आहे.
Tuesday, May 21, 2024
BULDHANA | चरित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Post Top Ad
आम्ही आपला विदर्भ लाईव्ह या वाहीनीची निर्मिती केली जनसामान्यांची शक्ती एक केंद्रित झाली तर कोणतीही ताकद तिला अडवू शकत नाही त्यासाठीच या उपक्रमात आपली साथ आम्हाला मोलाची आहे सहभागी व्हा सहकार्य करा आणि ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीविषयी त्या गावाविषयी कृतज्ञ भाव ठेवून आमच्या वहिनीला तुमच्या सेवेची संधी द्या चला तर मग एक नवे क्षितीज. नव्हे एक नवे स्वप्न आपण मिळून पाहूया आपला विदर्भ लाईव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास आपला विदर्भाचा व देशाचा विकास हे ब्रिद वाक्या मनाशी बाळगून या उपक्रमाची एकजुटीने आपला विदर्भ लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपले हक्काचे व्यासपीठ बनवूया...