BULDHANA Mehkar, ना वशिला , ना ओळख ; थेट मिळते वैद्यकीय मदत - रामहरी राऊत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 17, 2024

BULDHANA Mehkar, ना वशिला , ना ओळख ; थेट मिळते वैद्यकीय मदत - रामहरी राऊत

 (Apala Vidarbha News Network)
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुखमंत्री Chief Minister सहायता कक्षा मधून गरजू रुग्णांना आजपर्यंत तीनसे कोटीच्या पुढे आजपर्यंत वैद्यकीय मदत रुग्णांना वितरित केली असल्याची माहिती राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत ( empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या २ वर्षांत एकूण 301 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित

मु.वै.स.क. मंत्रालय,ministry  मुंबई कार्यालयामधून तब्बल 275 कोटींपेक्षा अधिक तर मु.वै.स.क.,नागपूर कार्यालय मधून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप 

मुख्यमंत्री Chief Minister वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत. 

यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या २ वर्षांत ३५,००० पेक्षा अधिक गोरगरीब - गरजू रुग्णांना एकूण 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. राज्याचे लोकप्रिय श्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत  व असल्याचे रामहरी राऊत कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे Chief Minister Eknathji Shinde यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याच यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राम हरी राम हरी राऊत राज्य प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्षमहारष्ट्र राज्य मेहकर मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की मागच्या अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्राला मिळाले त्यामध्ये 25 हजार रुपये मेहकर मतदारसंघाला मिळाले आणि माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये अडीच कोटी रुपये मेहकर मतदार संघासाठी मिळाले तर गर्व गरिबांची जाण असलेला गोरगरिबांची जाण ठेवणारा कोणत्याही वैद्यकीय सेवेपासून वंचित न राहता सर्वांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे अनेकांचे प्राण वाचले पाहिजे त्यांना जीवदान मिळाले पाहिजे हीच या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांचे काम आहे असे आमदार संजय अमृतकर यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद मध्ये बोलत होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव शिवसेना शहर प्रमुख जयचंद बाठीया उप तालुकाप्रमुख समाधान साबळे युवासेना तालुका अध्यक्ष भूषण घोडे भुजंग रहाटे वैद्यकीय जिल्हा  विस्तारक अमर राऊत तालुका विस्तारक  विलास आखाडे भुजंगराव रहाटे सर्व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post Top Ad

-->