DHULE | देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले - चंद्रशेखर बावनकुळे - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 12, 2024

DHULE | देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले - चंद्रशेखर बावनकुळे


धुळे उद्धव ठाकरे हे मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात हा काळूबाळूचा तमाशा असून त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधीला मुलाखत दिली पाहिजे या मीडियासमोर येऊन उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे विजय वेडेट्टीवारांनी अजमल कसाबची भूमिका घेतली. देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आजपर्यंत एकदाही भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसचा प्रचार करीत आहेत या उलट ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत याचा अर्थ विजय वडेट्टीवार यांनी केलेलं अजमल कसाब बाबतचे विधान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे. आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना मत का द्यावीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेशी बेईमानी केली मुंबईची बेईमानी केली असा त्याचा अर्थ होतो. मुंबईकरांना छिंन्न विचिन्न करणारा अजमल कसाबचा समर्थन विजय वडेट्टीवार यांनी केले, त्याचा समर्थन उद्धव ठाकरे करीत आहेत. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी करीत आहेत असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती ह्या पेरून तयार केलेल्या असतात, जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देणे आहे. उद्धव ठाकरेंना मत देणे म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मत देणे आहे, विशिष्ट धर्माकरीता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला आहे, उद्धव ठाकरेंचं संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आहे त्यामुळे कॉंग्रेसला मत देणे म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह करणे आहे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेल्या नरेंद्र मोदींवरच्या आरोपावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशाला माहित आहे की प्रियंका गांधी यांचे कर्तृत्व काय आहे, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची मुलगी एवढेच त्यांचे कर्तृत्व. विशेष समाजाची आणि धर्माची मत मिळवण्यासाठी मोदींसारख्या विकास पुरुषावर प्रियंका गांधी टीका करतात प्रसिद्धी मिळण्यासाठी अशा प्रकारची विधान करणाऱ्यांमध्ये प्रियंका गांधी असल्याच चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे. काँग्रेसने आदिवासींना कधी आपलं समजलं नाही गेल्या 55 वर्षात काँग्रेसने आदिवासींसाठी काय केलं त्यांना कोणी अडवलं होतं, मी 1000 उदाहरण दाखवू शकतो काँग्रेसने आदिवासींवर कसा अन्याय केला, गेल्या दहा वर्षात मोदींनी आदिवासींबाबत निर्णय घेतला आदिवासी समाज भाजप सोबत आणि महायुती सोबत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटले आहे. देशातली जनता नरेंद्र मोदींसोबत असून उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो लावून 18 जागा जिंकल्या आता त्यांनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत राहून 18 खासदार निवडून दाखवावे, तुम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे पतन केलं महाराष्ट्राचं पतन केलं, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तुत्व होतं म्हणून 18 जागा आल्यात मोदींचे विचार होते म्हणून जागा आल्या बाळासाहेब ठाकरे यांची विचार उद्धव ठाकरेंनी सोडले आहेत बाळासाहेबांची विचार सोडले मोदींची साथ सोडली अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात मोदींची सुनामी लाट आली असून ही लाट महाविकास आघाडीची झाडपट्टी उडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Post Top Ad

-->