JALGAON | खडकदेवळा खुर्द येथे विजेचा शॉक लागून गाय दगावली - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 12, 2024

JALGAON | खडकदेवळा खुर्द येथे विजेचा शॉक लागून गाय दगावली

ळगाव पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील शेतकरी परसराम कडूबा बनसोडे यांच्या मालकीच्या शेतात शनिवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजेची तार तुटून गाईवर पडली असता विजेचा शॉक लागून गाय दगावली असल्याची घटना खडकदेवळा खुर्द येथे घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे 40 ते 50 हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर घटनेची माहिती सुदाम वाघ यांनी वीज मंडळ व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता विज वितरण कंपनीचे भुषण महाजन व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. सदर घटनेची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी परसराम बनसोडे यांनी केली आहे. यावेळी खडकदेवळा खुर्द ग्रामपंचायतचे सुदाम वाघ माजी सरपंच रमेश शेलार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच कपूरचंद तेली, शाल्लीक दाभाडे शेतकरी परसराम बनसोडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post Top Ad

-->