निवडणुकीच्या तोंडावर मेळाव्याची चढाओढ
मेहकर विधानसभा मतदार संघातील चित्र
मेहकर. विधानसभा निवडणूक ही जशी जशी जवळ येत आहे. तसतसे राजकीय वातावरण चांगलेच गरम होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष व संघटनांकडून मिळाव्याचे आयोजन केल्या जात असून मेळाव्याची जणू चढाओढ लागल्याचे चित्र मेहकर मतदार संघात दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूक ही पुढील महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी आपली राजकीय फिल्डिंग लावणे सुरू केली आहे. तर, इच्छूक उमेदवारांकडून सुद्धा मतदार संघात भेटी देऊन मतदार व पदाधिकारी तसेच प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटीघाडी सुरू केल्या आहेत. तसेच इच्छूक उमेदवारांकडून पक्ष मिळावे, सामाजिक कार्यक्रम यास इतर कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न पक्षांकडून केला जात आहे. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या पक्षाला पक्षाच्या उमेदवाराला मतदानाचा फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षाने मेळाव्याचे आयजन सुरू केले आहे. मेहकर मतदार संघातही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने मेळाव्याची आयोजन करून चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेने मतदारसंघात सर्कलनिहाय, तालुका निहाय, यासह मोठ्या गावाचे लोकसंख्या बघून मतदारांना आपल्याकडे खेचण्याकडे मेळाव्याचे आयोजन करणे सुरू केले आहे. त्यामुळे मतदारसंघात मेळाव्या मेळाव्याचे आयोजन करण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.इच्छूक उमदेवारांकडून स्थानिक पदाधिकारी तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व नेते बोलवून त्या ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन केले जात आहे. एरवी पाच वर्ष कधीही न दिसणारे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आता मात्र चांगले सतर्क झाले असल्याचे चित्र मेहकर मतदार संघात होत असलेल्या मेळाव्यावरून दिसून येत आहे.तसेच या मेळाव्यात आम्ही विकास करणार असल्याचे आश्वासन देत मतदारांना आतापासूनच आमिष दाखविले जात आहे. तर मतदार राजा आता हुशार झाल्याने या पदाधिकार्यांच्या अमिषाला बळी न पडता त्यांना प्रश्न करीत त्यांची बोलती बंद केली जात आहे.त्यामुळे अनेकवेळा अनेक पदाधिकारी व पक्षाचे नेते हे कोंडीत अडकत असल्याचे सुद्धा दिसून आले आहे. मेहकर विधानसभा मतदार संघात आता सर्वच पक्षाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने मोठमोठ्या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. त्यावरून राजकीय वातावरण सुद्धा चांगलीचे गरम होत असल्याचे दिसून येत आहे. तर आयोजित मेळाव्यात पदाधिकारी तथा आयोजक हे विरोधकांवर जहरी टिका करीत असल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडत असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमिवर मात्र राज्यासह बुलडाणा जिल्ह्याचे व मेहकर मतदार संघाचे राजकारण सुद्धा गरम होत असल्याचे दिसून येत आहे.
- मेळाव्यासाठी रोजाने नागरिक
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळाव्याचे आयोजन केले जात असले तरी, या मेळाव्याला अपेक्षीत गर्दी जमविण्यासाठी आयोजकांकडून अनेक ठिकाणी मजुरीने नागरिकांना आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता तर पुढील काही दिवसामध्ये सोयाबीन कापणीचा हंगाम असल्याने मजूरही मिळणे कठीण होणार असल्याचे बोलले जात असून मजुरांच्या दरातही दुप्पटीने वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व गावागावात होत आहे.