गोसावी समाजाच्या उन्नती साठी महामंडळ स्थापन करून दोनशे कोटीची तरतूद करावी :सिद्धार्थ खरात
मेहकर. दशनाम गोसावी बचाव समिती महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणार्या व सेवा निवृत्त झालेल्या मान्यवरांच्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दि.२२ सप्टेंबर रोजी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय जवळ हरणटेकडी येथे दशनाम गोसावी समाधी बचाव समिती च्या वतीने गोसावी समाजातील गुणवंत व पानाआड दडलेल्या प्रतिभावंतांचा जाहीर सत्कार आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालयीन सेवानिवृत्त सहसचिव तथा शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सिद्धार्थ खरात म्हणाले की जो समाज एकत्र येऊन संघटित होतो तो समाज उन्नती करतो म्हणून शासनाने या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी गोसावी समाज महामंडळ स्थापन करून दोनशे कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी अशी मागणी खरात यांनी यावेळी केली.या वेळी विविध क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी आपला ठसा उमटवला उत्तुंग यश प्राप्त केले त्या मान्यवरांचा व गुणवंत विध्यार्थी यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उदघाट्क श्री.महंत योगी श्याम बाबा भारती (श्री क्षेत्र माहूर गड) कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गिरी प्रदेशाध्यक्ष दासनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती, प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना उपप्रमुख आशिष रहाटे, लिंबाभाऊ पांडव, किशोर गारोळे, ॲड आकाश घोडे,रामेश्वर गिरी,उपविभागीय अधिकारी ब्रम्हगिरी, पोलीस निरीक्षक अमरावती नवनियुक्त RTO गौरव गिरी, राजेंद्र गिरी, सहदेव पुरी,यांची उपस्थिती होती
पुढे बोलतांना खरात म्हणाले की ज्या समाजामध्ये कल्पक तरुनाई असते त्या समाजाची प्रगती होते. या समाजाने देशाला अध्यात्म दिलं आहे. या समाजाने आधात्माच्या बळावर इथल्या समाजाचं दुःख हरण करण्याचं काम केलं. त्यामुळे सरकारने या समाजाला दफनभूमी साठी जागा अधिग्रहित करून जागा उपलब्ध करून द्यावी तसेच या राज्यात आमचे माविकास आघाडीचे सरकार नक्कीच येणार आहे. तुम्ही अत्यंत योग्य माणसाला आज येथे बोलावले आहे. मेहकर मतदारसंघात सुद्धा बदल होऊन. इथे सुद्धा शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे. मला जर उमेदवारी मिळाली तर निश्चित तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी तडीस नेईल. असेही आश्वासन खरात यांनी दिले, या वेळी सर्व गुणवंतांचे स्वागत केले.तर संचलन व आभार गणेश पुरी यांनी मानले या कार्यक्रमाला जिल्हाभरातून गुणवंत विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अठरापगड जातीला सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी काम केले आहे .आता सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला पसंती देण्याची संधी आहे. त्यामुळे गोसावी समाजाच्या उन्नतीसाठी सर्व समाज बांधवांनी ताकतीनिशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत राहावे, पक्षानी मला उमेदवारी दिली , तुम्ही आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, गोसावी समाजाच्या मागण्या निकाली काढेल असे आश्वासन यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार यांनी सिद्धार्थ खरात यांनी दिले.तर यावेळी दशमान गोसावी समितीच्या वतीने दशमान गोसावी समाज बांधव आपल्या सोबत राहील असे असा विश्वास दिला.