बुलढाणा मतदार संघाचा विकास होतो तर मेहकर मतदार संघाचा का नाही, चर्चेला उधाण
आ.संजय गायकवाड यांचे होत आहे जिल्हाभर कवतूक मात्र दुसरीकडे आ.संजय रायमूलकरवर नाराजी...
बुलढाणा. बुलढाण्याचा शहरासह मतदार संघाचा झपाट्याने विकास पाच वर्षात होऊ शकतो, मग आ. संजय रायमुलकर हे तर पंधरा वर्षापासून आमदार असताना मेहकर विधानसभा मतदार संघाचा पाहिजे तसा विकास का झाला नाही.आ. संजय गायकवाड हे विकासाच्या बाबतीत कर्तव्यनिष्ठ आहेत..? तर मेहकरचे आ. संजय रायमुलकर हे आमदार यांची चर्चा सोशल मीडियावर करीत जनता आ. संजय रायमुलकर यांच्या कार्यावर प्रश्न निर्माण करीत आहेत.
बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासह 26 स्मारकांच्या करोडो रुपयांच्या विकास कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दि.19 सप्टेंबर रोजी संपन्न.यावरून आमदार संजय गायकवाड यांना विकास कामासाठी निधी खेचून आणण्यात मोठे यश मिळाले असल्याचे दिसून येत आहे. तर मेहकर विधानसभेतील महत्त्वाचे दोन तालुके विकासापासून अद्यापही वंचित आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून डॉ.संजय रायमुलकर आमदार हे या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र त्यांना विकास कामे खेचून आणता आले नसल्याची चर्चा सोशल मीडियावर होत असून मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला जात आहे. बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी अवघ्या पाच वर्षात बुलढाण्याचे चित्र बदलले आहे व बुलढाणा विधानसभेमध्ये करोडो रुपयांचे कामे अवघ्या पाच वर्षात खेचून आणले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर डॉ.संजय रामुलकर 15 वर्षात कामे आणण्यास अथवा करण्यास अत्यंत निष्क्रिय ठरले असल्याची चर्चा आता मेहकर विधानसभेमध्ये चांगलीच रंगत आहे.तर शिवसैनिक स्थानिक आमदारावर नाराज असल्याचा सूर सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेतून दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मेहकर मतदार संघाचे तीन टर्म राहिलेले आमतदार डॉ.संजय रायमुलकर यांना याचा मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दैनिक आपला विदर्भ ई पेपर 21 सप्टेंबर 2024
बुलढाणा प्रमाणे विकास का झाला नाही
बुलढाणा शहर अथवा मतदार संघात झालेल्या विकास कामाप्रमाणेच मेहकर शहर व लोणार शहर अथवा मेहकर विधानसभा मतदार संघात का झाली नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर आता शिवसैनिकच करीत असून आ. संजय रायमुलकर यांच्यासोबत राहणार आहे. यात काही शंका नसल्याचे बोलून मेहकर मतदार संघातील मराठा समाज व मतदार संघातील मतदारांकडून आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याची खंत मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्याबाबत व्यक्त केली जात आहे.
काय आहे मेहकर व लोणार मध्ये ऐतिहासिक
लोणार म्हणजे जगद्विख्यात, जगप्रसिद्ध उल्कापातामुळे निर्मित जगातल्या तीनपैकी दोन नंबरचे आणि बेसॉल्टीक खडकातले जगातले एकमेव सरोवराचे गाव आहे.
लोणार सरोवर परिसरात 32 मंदिरे, 17 स्मारके, 13 कुंड आणि 5 शिलालेख आहेत यांपैकी 27 मंदिरे, तीन स्मारके, सात कुंड आणि तीन शिलालेख सरोवराच्याच परिसरात आहेत आणि इतर वर गावाच्या परिसरात आहेत. इथली मंदिरे आणि कुंड म्हणजे आणखी वेगळा अनुभव.असा लोणार चा ऐतिहासिक इतिहास आहे. हे जगप्रसिद्ध सरोवर व हा इतिहास जाणून घेण्यासाठी देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात त्यावेळेस मात्र विकास हरवल्यासारखे नक्कीच जाणवते हे मात्र तेवढेच खरे..
का आहे मेहकर तालुक्यात जनतेची नाराजी..
मेहकर तालुक्यांत जवळपास 98 ग्रामपंचायत असून जवळपास मेहकर तालुक्यामध्ये 160 गावे आहेत. यामधील अनेक गावे विकासापासून कोसो दूर असल्याचे बोलल्या जात आहे तर इतर गावांमध्ये आजही अनेक समस्या ह्या कायम असून स्थानिक लोकप्रतिनिधी पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार यांच्यावर जनतेची नाराजी दिसून येत आहे. सलग पंधरा वर्ष आमदारकी आपल्या हातात असताना व सत्ताही असताना विकास कामासाठी निधी खेचून आणण्यासाठी अपयश आलेत का..? याबद्दल आता तर्क वितर्क लावल्या जात आहेत तर आता मात्र नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असल्याचे आता हळूहळू दिसून येते आहे..