ऋषांक चव्हाण व डॉ. ऋतुजा चव्हाण यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कार
चव्हाण दाम्पत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव : सहकार व वैद्यकीय क्षेत्रात दाम्पत्यांचे योगदान
मेहकर. , महापुरुषांचे विचार अंगिकारुन करून सहजीवनाची वाटचाल करणार्या व आंतरजातीय विवाह करुन करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करर्याबरोबरच सहकार व वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान देणार्या डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण आणि डॉ. ऋतुजाताई चव्हाण-गवई या दाम्पत्यांचा आदर्श दाम्पत्य म्हणून दि.22 सप्टेंबर रोजी मेहकर येथील हॉटेल के.व्ही. प्राईड येथे गौरव करण्यात आला.
समाजसुधारकांच्या स्वप्नातील समाजाच्या बांधणीसाठी या दाम्पत्यांनी पाऊल टाकत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सहकार व वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ऋषांक चव्हाण हे तरुण तडफदार व्यक्तीमत्व म्हणून सर्वत्र परिचित असून त्यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. ग्राहकांना स्नेहपूर्ण तात्काळ सेवा देऊन त्यांनी सहकार क्षेत्रात वेगळेपण जपले आहे. डोणगाव अर्बन पतसंस्थेतील व्यवस्थापकासह सर्व कर्मचार्यांना आपलेसे करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या ताटातील अन्न हे सगळेच आपले नव्हे, तर त्यातील काही घास इतरांनाही द्यावेत, ही भावना कायम ऋषांक चव्हाण यांच्यामध्ये असल्याचे वेळोवेळी त्यांच्या सामाजिक कार्यावरून दिसून येत आहे. कमी वयामध्ये प्रगती करुन मोठा दृष्टिकोण ठेवत सर्वोत्तम कामं करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ऋषांक चव्हाण यांना ओळखले जाते. त्यांच्या पत्नी ह्या एमबीबीएस डॉक्टर आहेत.
उच्चविद्याविभूषित व सामाजिक कार्याची आवड त्यांना आहे. राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या विविध सामाजिक कार्य करून अनेकांना मदतीचा हात देत उभे केले आहे. या सामाजिक कार्याच्या बळावर या दाम्पत्यांकडे राजकीय क्षेत्रातील एक उमदे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. या दाम्पत्यांच्या सकारात्मक विचारांचा आवाका प्रचंड आहे. त्यामुळेच जातपात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीयुक्त आचरणावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श दाम्पत्य पुरस्काराने जनस्वप्नपूर्ती परिवाराच्या वतीने दि.22 सप्टेंबर रोजी मेहकरमधील हॉटेल के.व्ही. प्राईड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे, डॉ. आरती पालवे, ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, श्रीराम मल्टिहॉस्पीटलचे संचालक डॉ. हेमराज लाहोटी, उद्योजक अविनाश वतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र अन् शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. आदर्श दाम्पत्य पुरस्कार वितरण सोहळ्यात रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर,शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रामेश्वर चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जे. एम. दांदडे, सुप्रसिद्ध व्यावसायिक उदय सावजी, शासकीय ठेकेदार रमेशराव काटे यांनाही आदर्श दाम्पत्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आदर्श दाम्पत्याचे राजकारणात पाऊल महापुरुषांचे विचार अंगिकारुन करून सहजीवनाची वाटचाल करणार्या ऋषांक चव्हाण व डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी सहकार व वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.या निस्वार्थ सामाजिक कार्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग मेहकर मतदार संघात निर्माण झाला आहे. उच्चविद्याविभूषीत व सामाजिक कार्याची जाण असणार्या या आदर्श दाम्पत्याचे राजकारणाकडे वळलेले पाऊल हे नक्कीच मेहकर मतदार संघाचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल. असा आशावाद सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करीत त्यांच्याकडे तरुणतडफदार व सामाजिक कार्याची जाण असणारे व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जात आहे.
देविदास खनपटे मुख्य संपादक लेखक