JALNA | जालना-बीड रोडवर बस-कंटेनरचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर ACCIDENT - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 20, 2024

JALNA | जालना-बीड रोडवर बस-कंटेनरचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर ACCIDENT


जालना-बीड रोडवर बस-कंटेनरचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

 जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याला जात होती,अंबडपासून 10 किमीवर झालेल्या या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 


जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. बस मध्ये एकूण 24 प्रवासी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Post Top Ad

-->