BULDHANA-MEHKAR, जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी थंडबस्त्यात कोट्यावधींचा खर्च पाण्यात : - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, September 15, 2024

BULDHANA-MEHKAR, जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी थंडबस्त्यात कोट्यावधींचा खर्च पाण्यात :


(APALA VIDARBH LIVE NETAVARKA )

तालुक्यातील 92 जलजीवन मिशन योजना अर्धवट  

मेहकर, मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेल्या गैरप्रकारची चौकशी करावी, अशी मागणी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी दि.20 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन केली होती. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चौकशी आदेश दिले होते. परंतु, अद्यापही चौकशी झाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या गैरप्रकाराची चौकशी करणार कोण व कोणाची चौकशी होणार हा गंभीर प्रश्न मेहकर मतदार संघात चर्चेला जात आहे. दैनिक आपला विदर्भ ई पेपर 15 सप्टेंबर 2024

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात सन २०२१ २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला.परंतु अद्यापही हे कामे पूर्ण झाली नाहीत तर, या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे.पावसाळ्यात उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन योग्य ती पाऊले उचलण्याची गरज असताना याकडेही दुर्लक्ष केले गेले आहे. ग्रामीण भागातील जनतेला नळ जोडणीच्या माध्यमातून शुध्द व स्वच्छ पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना आणली. सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन मिशनचे मुख्य उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत मेहकर तालुक्यातील 92 गावांत जलजीवन योजनेवर कामे टाकण्यात आले. सन 2021,2022  मध्ये निविदा प्रक्रीयाही पार पडली. सन 2021,2022 पासून बहुतांश कामाला सुरवात झाली. काही कामांची निविदा नंतर होऊन कामाची कामाची संख्या वाढत गेली. मात्र अल्पावधीतच अनेक गावातून कामांबाबत तक्रारी देखील वाढल्या. कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई होत असल्याचा आरोपही झाला. आधी 2024 मध्ये पुर्ण होण्याचा कालावधी असतांना तालुक्यातील एकही योजना आजपर्यंत पूर्ण न झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असली तरीही जलजीवन मिशनची गती मात्र मंदावलेलीच आहे. बहुतांश ठिकाणी होत असलेल्या कामांच्या तक्रारीही करण्यात आल्या असल्यामुळे कामाचा दर्जा तपासण्याची मागणी झाली. या तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी दि.20 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली.तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चौकशी आदेश दिले. मात्र अद्यापही चौकशी झाली नसल्याने ही चौकशी करणार कोण व कोणाची चौकशी होणार असा प्रश्न मेहकर मतदार संघातील चर्चेला जात आहे.

Post Top Ad

-->