बाभूळगाव आलेगाव मार्गावरील घटना
(आपला विदर्भ नासीर शेख पातुर )
पातूर : पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत बाभुळगाव आलेगाव मार्गावरील विवरा फाट्यावर दूचाकीच्या अपघातात इसम जागेवरच ठार झाल्याची घटना रविवार दि.१५ सप्टेंबर रोजीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली, बाळू भगवान दामोदर रा. व्याळा ता. बाळापूर असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक बाळू दामोदर व्याळा येथून एम एच ३० बी एस १३८० क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने आलेगाव येथे बहिणीच्या घरी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह ते रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत असल्याचे विवरा येथील प्रशांत देशमुख रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास आल्याने सदर घटना उघडकीस आली, या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह व घटनेचा पंचनामा केला मृतदह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार अकोला येथे पाठविण्यात आले असून, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.