शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र फाडल्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी #CONGRESS #SHIVSENA #CM #DCMDEVENDRAFADNVIS #RAHULBONDRE - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 24, 2024

शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र फाडल्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी #CONGRESS #SHIVSENA #CM #DCMDEVENDRAFADNVIS #RAHULBONDRE

 


शेतकर्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र फाडल्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी

सावरगाव येथे कॉंग्रेस पदाधिकार्यांचे अन्नत्याग आंदोलन : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन

बुलढाणा. शेतकर्यांच्या विविध मागण्या निकाली काढाव्यासाठी दि.१९ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी रक्ताने लिहलेले निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देऊ न देता ते  दडपशाही करून फाडल्याबदल गृहमंत्र्यांनी माफी मागावी व दडपशाही करणाऱ्या अधिकार्यांवर कार्यवाही करावी,या मागणीसाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष्य तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात सावरगांव डुकरे येथे दि.23 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.


बुलढाणा येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुखमंत्री हे दि.१९ सप्टेंबर रोजी आले असता शेतमालाला हमी भाव द्यावा, शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम द्यावी,आदींसह  मागण्या निकाली काढण्यासाठी चिखली येथे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकयांचा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच त्याच दिवशी मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यानी रक्ताने लिहिलेल्या निवेदन देऊन शेतकर्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री यांना रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी सबंधित अधिकार्यांची परवानगी मागितली.मात्र सदर परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी कार्यकर्यांसह केला असता राज्यशासनाने पोलिस प्रशासनाच्या बळावर दडपशाही केली व निवेदन फाडून टाकले, मुख्यमंत्री सदर निवेदन पोहचू दिले नाही. त्यामुळे या सरकाने शेतकर्यांची ही थट्टा केली असून गृहमंत्र्यांनी शेतकर्यांची माफी मागावी व संबंधीत दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी,या मागणीसाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी दि.23 सप्टेंबर 2024 रोजी सावरगाव डुकरे या गावी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अन्नत्याग आंदोलनास मेहकर विधानसभा येथील सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षानी पाठिंबा देत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, भास्करराव काळे, अनंतराव वानखेडे, आशिष रहाटे सिद्धार्थ खरात, नंदू बोरे,नाजीमभाई कुरेशी, संपतराव देशमुख, देवानंद पवार, दत्ता घनवट, निंबाजी पांडव, किशोर गारोळे, विनायक टाले, पंकज हजारी, अॅड्.विजय मोरे, आकाश घोडे, , शैलेश बावस्कर, डॉ.शेषराव बदर, अनिल देशमुख, भूषण संजय काळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.


सरकारावर शेतकर्यांची नाराजी  _
शेतकर्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी रक्ताने लिहिलेले निवेदन न स्वीकारता राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला हाताशी धरून फाडल्याबद्दल शेतकर्यांमध्ये महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Post Top Ad

-->