APALA VIDARBH NEWS NETWORK
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुस दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला आहे. रात्री उशिरा नंदुरबार मध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. सोबतच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असेल तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केले असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस असा मोठा फौज फाटा होता. विशेष म्हणजे आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले