Mehkar Vidhanasabha उपऱ्या उमेदवारांना लागले आमदारकीचे डोहाळे... - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 16, 2024

Mehkar Vidhanasabha उपऱ्या उमेदवारांना लागले आमदारकीचे डोहाळे...


(APALA VIDARBH LIVE NEWS NETWORK)

मेहकर. स्थानिक राजकारणाशी कोणताही संबंध नसताना तसेच मतदार संघातील समस्याची कोणतीही माहिती नसताना केवळ पैशाच्या जोरावर आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मतदारसंघाबाहेरील उपर्यांना आता आमदारकीचे डोहाळे लागणे सुरू झाले आहे. मात्र पाच वर्ष तोंड न दिसलेला उमेदवार मतदार स्वीकारतील का असा प्रश्न या इच्छुक उपर्या उमेदवारांच्या पोस्टरबाजीवरून उपस्थित होत आहे. 

मतदार संघात शेकडो समस्या असताना त्या समस्या निकाली काढण्यासाठी एकदाही पुढाकार न घेतलेल्या तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी ब्रश शब्दही न काढलेल्या व कोणत्या समस्या आहेत. याबाबत कोणतेही माहिती नसलेल्या उमेदवारांना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. केवळ पैशाच्या बळावर हे उमेदवार मेहकर लोणार मतदार संघात आपले नशीब अजमावित आहेत. मात्र पैसा फेको तमाशा देखो या म्हणीप्रमाणे ते राजकारणाचे वाटोळे करीत असल्याने मतदार या उपर्या उमेदवारांना स्वीकारतील का असा प्रश्न मतदारसंघात चर्चेला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेहकर विधानसभेत आता हळूहळू रंगत येत आहे. आता उपरे उमेदवार सुद्धा मेहकर मतदार संघावर दावा करत असल्याचे फलक लावून रोडवर चमकत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. यातच शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर आता उमेदवार सुद्धा दोन्ही गटाचे असणार असून दोनही शिवसैनिक समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगत होणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर ही मागील पंधरा वर्षापासून सलग मतदारसंघात असताना त्यांच्या समोर मात्र आता उपरे उमेदवार येऊन मतदारसंघात भेटीगाठी व रोडवर फलक लावून चांगले चमकत आहेत. तर एका बाजुला जनता जनार्दन यांचा कौल कुणीकडे असणार आहे हे सुद्धा तितकच महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र उपर्या उमेदवार यांना जनता स्वीकारेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एका उपर्या उमेदवारांनी जवळपास मेहकर विधानसभामध्ये शेकडो फलक लावून रोडवर चमकण्याचे काम सुरू केल्याच दिसून येत आहे.

कधी न दिसणारे उपरे उमेदवार दिसतायेत निवडणुकीच्या तोंडावर मेहकर शहरासह संपूर्ण मतदारसंघात  रस्त्यारस्त्यावर शेकडो फलक लावून चमकताना हे उपरे दिसून येत आहेत.परंतु, मतदार राजा या उपर्यांना स्वीकारेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे... 

डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना मिळत आहेत चांगली पसंती मेहकर मतदार संघात गेल्या पंधरा वर्षापासून एकच आमदार सतत निवडून येत असल्याने पाहिजे तशी जनतेची कामे होत नाहीत अनेक समस्या अजून मेहकर मतदार संघात कायमच आहेत पंधरा वर्षे एकच आमदार असून सुद्धा समस्या कायम कशा राहतात असा प्रश्न उपस्थित होत आहे सुशिक्षित बेकारी रोजगार महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न मूलभूत सुविधा असे अनेक प्रश्न सध्या मेहकर मतदार संघात आहेत याच पार्श्वभूमीवर सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेक उपरे किंवा बाहेरचे इच्छुक उमेदवार जनतेशी संपर्क करत आहेत मात्र मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी व ज्या मेहकर मतदार संघात सर्वांना सुपरीचीत सुशिक्षित व महिला उमेदवार असलेल्या डॉक्टर ऋतुजा ताई यांना जनतेमधून चांगली पसंती मिळत असून जनता जनार्दन नक्कीच डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असे चित्र दिसत आहे  विधानसभा 



Post Top Ad

-->