मेहकर लोणार मतदार संघ हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. मतदारसंघातील नागरिकांचाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उच्चशिक्षित व्यक्तिमत्व डॉ. सौ. ऋतुजा ऋंषाक चव्हाण यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांना नागरिकांकडून पाठिंबा जाहीर केला जात असून मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला सर्वच स्तरावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रचंड मताने विजयी करावा, यासाठी वंचितचे सर्वेसर्वा अॅड्.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मेहकर येथील यशवंत मैदान येथे भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीला मिळत असलेला पाठिंब्याने विरोधकांचे धाबे दणाणले असून या सभेत Advआंबेडकर काय बोलतात याकडे मतदार संघात राज्याचे लक्ष लागलेले आहेत.
मेहकर. मेहकर लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा Adv प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मेहकर येथील यशवंत मैदान नगरपरिषद येथे दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मतदारसघातील मतदारांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ. ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे.