शेंदला येथील जगदंबा मॉतेचे दर्शन घेऊन. धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या समाधीवर नतमस्तक होत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नारळ फुटले...
डॉ. सौ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचाराला प्रचंड जल्लोषात प्रारंभमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्व घटकातील मतदारांचा समावेश
मेहकर. मेहकर लोणार मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडी व शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे अधिकृत उमेदवार डॉ सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचाराचे नारळ दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना एकसंध ठेवून विकासाची गंगा तळागाळातील जनतेपर्यत पोहचविण्याचा त्यांचा निर्धार प्रचाराच्या सुरुवातीलाचा दिसून आला. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या मुद्द्यावर आपण परखडपणे बोलू असा संकल्पही त्यांनी अधोरेखित केला.
प्रचाराला सुरवात करताना शेंदला येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन. व धर्मवीर स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नारळ फुटले व दर्गा येथे भेट देऊन त्यांनी मौलाना यांचा आशीर्वाद घेतला. समोर श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन गजानन महाराज यांच्या पुढे नतमस्क होऊन परिवर्तनाच्या वाटेला बळकटी देण्यासाठी ही लढाई आहे, अशी समर्पणात्मक भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ सौ.ऋतुजा चव्हाण यांना जनतेचा मिळणारा उदंड पाठिंबा व जनसंवाद दौरा पाहता मेहकर लोणार मतदारसंघात एकमेव दमदार नेता असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचाराला पहिल्याच दिवशी मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा प्रस्थापितांना धडकी धडकी भरविणारा राहिला. जनसमर्थन व जनतेचे मत पाहता ग्रामीण भागातून डॉ सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्यामुळे प्रस्थापितांना मोठा धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून प्रचाराच्या पुढील काळात या प्रतिसादाचा आलेख वाढतच असणार आहे.