वंचितच्या उमेदवार डॉ.सौ. ऋतुजा चव्हाण यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गावागावात प्रचार दौरा : युवकांनी दिला पाठिंबा तर ज्येष्ठांनी दिले आशीर्वाद
मेहकर. मेहकर लोणार विधानसभा मतदार संघातील Vanchit Bahujan Aghadi गावागावात प्रचार दौरा : युवकांनी दिला पाठिंबा तर ज्येष्ठांनी दिले आशीर्वाद वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या, युवा नेतृत्व उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉ.सौ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी मेहकर मतदार संघातील गावागावात प्रचार दौरा केला असता यावेळी युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच डॉ. सर्व ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना उस्त्फूर्त प्रतिसाद देत विजयाचे आशीर्वाद दिले. सोमवारी अॅड.प्रकाश आंबेडकर यांची मेहकर येथे जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीला मिळत असलेला पाठिंब्याने विरोधकांचे धाबे दणाणले
मेहकर लोणार मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे तसेच मित्रपक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्याकडून उच्च विद्याविभूषीत, सामाजिक कार्याची, गोरगरिबांच्या अडचणीची जाण असलेले व्यक्तीमत्व डॉ. सौ.उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचाराचा झंजावतही सुरू झाला असून शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी मतदारसंघातील लोणार येथे सकाळी 9 वाजता किन्ही येथे दुपारी 1 वाजता, तांबोळा येथे दुपारी 2 वाजता प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी मतदार संघातील युवक, युवती, महिला यासह ज्येष्ठांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचे आशीर्वाद देत आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. गावागावात या प्रचार दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.सौ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी मतदारसंघातील विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून मतदारसंघातील प्राथमिक सुविधांपासून ते युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्व तो प्रयत्न केल्या जाईल, गावातील पाणी, रस्ते, वीज, सिंचन आदी समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य राहील असे आश्वासन मतदारांना दिले. तर मतदारांनी हे एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळत असलेला पाठिंब्यामुळे विरोधकांच्या तंबूत घबराट पसरल्याची चर्चा मेहकर लोणार विधानसभा मतदार संघात सुरू झाली आहे.तर दुपारी 3 वाजता गायफळ येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता शिवनी पिसा येथे, सायंकाळी 6 वाजता अंजनी खुर्द या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांचा प्रचार दौरा व गाव भेटी दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रचंड पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.