Vanchit Bahujan Aghadi डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी भेट घेऊन साधला संवाद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, November 9, 2024

Vanchit Bahujan Aghadi डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी भेट घेऊन साधला संवाद


डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी भेट घेऊन साधला संवाद 

शेतकऱ्यांचाही डॉ. चव्हाण यांना पाठिंबा  

मेहकर. मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी व घटक पक्ष असलेल्य शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा चव्हाण यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंजावत सुरू केला असून या प्रचारादरम्यान वंचितच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी बाजार समितीमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. 

मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणाचा गाडा हाकला जातो. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाला जिल्ह्यात एक विशेष महत्त्व आहे. यावेळेस विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सर्व ताकदीनिशी उडी घेत विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे. गत दोन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऋतुजा चव्हाण यांनी प्रचाराला प्रारंभ केला असून मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातील विविध गावात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला आहे. तर या प्रचारादरम्यान त्यांनी बाजार समितीमध्ये जाऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोयाबीनसाठी लागणारे श्रम, पेरणी ते कापणी पर्यंत लागणारा खर्च, यासह निंदण या  सर्व बाबीबाबत शेतकऱ्यांसह सोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर एकरी होणारे उत्पादन व एकरी होणारा खर्च याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये प्रचंड तफावत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे हे आतबट्ट्याचे ठरत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. तर डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी  शेतकऱ्यांसोबत विविध विषयावर संवाद साधून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दिवसा वीज पुरवठा, शेतमालाला हमीभाव आदी प्रश्न निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तर शेतकऱ्यांनी हे उच्च विद्याविभूषित सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या विचाराने  प्रभावित होऊन त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. गावागावात मिळणारा पाठिंबा व युवक महिला यांचा वंचित बहुजन आघाडीकडे असलेला ओघ पाहता मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.

Post Top Ad

-->