Anusucitaअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना English इंग्रजी शाळेत Pravesa प्रवेश; प्रक्रिया सुरु - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, April 15, 2025

Anusucitaअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना English इंग्रजी शाळेत Pravesa प्रवेश; प्रक्रिया सुरु

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश; 
बुलढाणा, दि. 15 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यात येतो, या योजनेअंतर्गत प्रवेश सुरु झाले असून दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

यासंदर्भात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडुन प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. हे अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळेत मिळतील. तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज जमा करावे. 

अटी व शर्ती :  या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत द्यावी, जर विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमूद करावा, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लक्षच्या आत असणे आवश्यक आहे. (तहसिलदाराचे), इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष पूर्ण असावे, जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.  

या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे, आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या व दारीद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल, विद्यार्थ्यांचे पालक शासकीय किवा निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल, इयत्ता दुसरीसाठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी, अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.   

Post Top Ad

-->