बुलढाणा, दि. 15 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दि. 8 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पोषण पखवाडामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सर्व शाळांनी सहभागी होऊन पोषण पखवाडा यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.
पखवाडा उपक्रमामध्ये जागरुकता कार्यक्रम, पोषण साक्षरता मोहिम, टॉयथॉन कार्यशाळा, स्पर्धा आणि उपक्रम, पालकांचा सभाग, पारंपारीक आणि स्थानिक अन्न प्रोत्साहन व आरोग्य आणि स्वच्छता जागरुकता असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शिक्षणाधिकारी(प्राथमिक), सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिक्षक (शापोआ) वर्ग 2 यांच्या अधिनस्त असलेले क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यांनी सहभागी होऊन पोषण पखवाडा यशस्वीपणे राबवावा.