तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर इच्छुकांना लागले सरपंच पदाचे वेध
मेहकर : स्थानिक स्वराज्य संस्थेत अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या ग्रामपंचायतीच्या आणि ग्राम स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. १६ एप्रिल रोजी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायत च्या सन २०२५ ते २०३० या कार्यकाळातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होतात काही खुशी कभ गम अशी चित्र दिसून आले असून इच्छुकांना सरपंच पदाचे वेध लागले आहे. मेहकर तहसील कार्यालयामध्ये १६ एप्रिल रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये सारंगपुर अ.जा. बाऱ्हई अ.जा., घाटनांद्रा अ.जा.
सोनारगव्हाण अ.जा. सोनाटी अ.जा., लव्हाळा अ.जा.,मोळा अ.जा., फैजलापुर अ.जा., बरठाळा अ.जा., लोणी गवळी अ.जा., दरवंड अ.जा.,आंघृड अ.जा., वरदडा अ.जा., पांगरखेड अ.जा., गजरखेड अ.जा., देउळगाव माळी अ.जा., चायगाव अ.जा.,
वरदडी वैराळ अ.जा., सावंगीवीर अ.जा., लावणा
अ.जा.,आरेगाव अ.जा., कळपविहीर अ.जा., साठी आरक्षीत निघाली आहे.तर, मारोतीपेठ अ.ज., शहापुर अ.ज., सारशिव अ.ज.,पारडा अ.ज., मादणी अ.ज. कासारखेड अ.ज. साठी आरक्षीत निघाली आहे. तर, वडगाव माळी ना.मा.प्र., लोणी ना.मा.प्र., कल्याणा
ना.मा.प्र., उसरण ना.मा.प्र., शिवाजीनगर ना.मा.प्र., उमरा ना.मा.प्र., सावत्रा ना.मा.प्र., कनका बु. ना.मा.प्र., दुधा ना.मा.प्र., थार बदनापुर ना.मा.प्र., विवेकानंद नगर ना.मा.प्र., जवळा ना.मा.प्र., माळेगाव
ना.मा.प्र., जनुना ना.मा.प्र.,हिवरा खुर्द ना.मा.प्र.,
चिचोली बोरे ना.मा.प्र., नायगाव दत्तापुर ना.मा.प्र.,
मोहना खुर्द ना.मा.प्र., पिपळगाव उंडा ना.मा.प्र.,
अकोला ठाकरे ना.मा.प्र.,बेलगाव ना.मा.प्र. पदासाठी आरक्षीत निघाली आहे व सर्वांचे लक्ष लागलेल्या
पेनटाकळी स.सा., दादुलगव्हाण स.सा., मोळी
स.सा., अंत्री देशमुख स.सा., उकळी स.सा.,
चोथा स.सा.,परतापुर स.सा., घाटबोरी स.सा. मोहना बु. स.सा., मांडवा समेत डोंगर स.सा., हिवरा साबळे स.सा. गोहोगाव स.सा., पारखेड स.सा., साम्रा स.सा.
सुकळी स.सा., बाभुळखेड स.सा., नागापुर स.सा.
देउळगाव साकर्शा स.सा., नायगाव देशमुख स.सा.,
उध्वा विठ्ठलवाडी स.सा., दुगबोरी स.सा., भोसा
स.सा., कळंबेश्वर स.सा., उटी स.सा., जानेफळ स.सा., बदनापुर स.सा., भालेगाव स.सा., बम्हपुरी
स.सा., शेलगाव देशमुख स.सा., कंबरखेड स.सा.,
वागदेव स.सा., लोणी काळे स.सा., विश्वी स.सा.,
अंजनी बु. स.सा., डोणगाव स.सा., मिस्कीनवाडी
स.सा., पिंप्री माळी स.सा., शेलगाव काकडे स.सा.,
गोमेधर स.सा., बोरी स.सा., गणपुर स.सा., मांडवा फॉरेस्ट स.सा., हिवरखेड स.सा., मुंदेफळ स.सा.,
वडाळी स.सा., खंडाळा स.सा., घुटी स.सा., वरुड
स.सा., शेंदला स.सा.असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये हिरमोड झाला असून काही खुशी काही गमचे चित्र दिसून येत आहे. तर, सरपंच पदाचे वेध लागलेल्या इच्छुकांनी मात्र, आरक्षण जाहीर होताच आनंद व्यक्त करीत पुढील रणनीती आखण्याची प्लॅनिंग केली आहे.
सर्वसाधारण पदासाठी निघालेल्या ठिकाणी होणार चुरशीची लढत तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून काही ठिकाणी अनुसूचित जाती काही ठिकाणी अनुसूचित जमाती तर काहीसाठी नागरिकाचा मागासवर्ग असे आरक्षण निघाले आहे. मात्र या आरक्षणामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित निघालेल्या ठिकाणी सरपंच पदासाठी निवडणुकी अत्यंत चुरशीची होणार आहे. अशी चर्चा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होतात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.