Shri Shivaji High School श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव चा ९८.५७% निकाल. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, May 14, 2025

Shri Shivaji High School श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव चा ९८.५७% निकाल.


        श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव चा ९८.५७% निकाल.

 बुलढाणा डोणगाव:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला यात श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव ने ९८.५७ टक्के निकाल घेत  आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी एकूण २८९   विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ६ विद्यार्थी ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. तर ९०% चे वर गुण घेऊन ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे एकूण १७० विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

सेमी इंग्रजी विभागातून साक्षी श्रीराम कढणे या विद्यार्थिनीला ९७. २० गुण मिळाले असून ती शाळेतूनच नव्हे तर डोणगाव विभागातून प्रथम आली आहे. दिपाली विठ्ठल शेवाळे हिला ९६.४० टक्के गुण मिळाले असून ती शाळेतून व डोणगाव विभागातून द्वितीय आली आहे. पूजा सज्जन मेटांगळे हिला ९६ टक्के गुण मिळाले असून ती तृतीय आली आहे. सृष्टी माधव पारिसकर हिला ९५. ६० गुण मिळाले असून तिने चौथा क्रमांक पटकावला आहे तर राखी मनोज वानखेडे हिने ९५. २० टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक मिळवला आहे.विशेष म्हणजे ७ विद्यार्थी गणित विषयात १००पैकी ९९ गुण मिळवून उत्तीर्ण झालेत. तर विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात १३ विद्यार्थ्यांना ९५ पेक्षा जास्त गुण मिळाले आहे.यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष राजेंद्रजी आखाडे, उपाध्यक्ष सुरेशपंत बाजड, कोषाध्यक्ष बळीरामजी बाजड, संचालक संजयजी आखाडे संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य संजय बाजड, उपप्राचार्य सुरेंद्रसिंह चव्हाण पर्यवेक्षक किरण आखाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Top Ad

-->