(APALA VIDARBHA NEWS NETWORK )
बुलढाणा, डोणगाव ते आरेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त नागरिक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांनंतर अखेर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. युवक काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वतः रस्त्याच्या पाहणीसाठी दाखल झाले.
पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले असून नागरिकांमध्ये यामुळे थोडासा दिलासा निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण? डोणगाव ते आरेगाव हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग गेल्या कित्येक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे या रस्त्याने प्रवास करणं नागरिकांसाठी मोठं संकट बनलं आहे. अपघातांची शक्यता, रुग्णवाहिका व शालेय वाहनांची गैरसोय या सर्व समस्यांमुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे, प्रदेश सचिव पंकज पळसकर आणि विजय सरकटे यांनी कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिलं. मात्र अधिकारी गैरहजर असल्यामुळे कार्यकर्त्यांनी खुर्चीला निवेदन अर्पण करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
गोपाल आखाडे म्हणाले, "आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन झोपेत आहे. जर आता चार दिवसांत काम सुरू नाही झालं, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू."
अखेर प्रशासनाची जाग! या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित ठिकाणी दाखल होऊन संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. त्यांनी "चार दिवसांत काम सुरू करू आणि नागरिकांची गैरसोय दूर करू," असे स्पष्टपणे सांगितले.
नागरिकांच्या मागण्या कायम नागरिकांनी प्रशासनाच्या आश्वासनाची नोंद घेतली असली, तरी यावेळी काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने केवळ आश्वासन न देता कृतीतून उत्तर द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये काम सुरू होते का? की पुन्हा नवीन तारीख दिली जाईल? नागरिक आणि युवक काँग्रेस दोघेही आता कठोर पावलांची तयारी करत आहेत
.jpg)
.jpg)