MLA Siddharth Kharat रस्त्याचं काम रखडलं, राजकारण जागं झालं! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, September 4, 2025

MLA Siddharth Kharat रस्त्याचं काम रखडलं, राजकारण जागं झालं!


गोपाल आखाडे यांचा इशारा, आमदार खरात यांचा हस्तक्षेप – अधिकारी धारेवर

डोणगाव-आरेगाव रस्त्यावरून राजकीय हलचालींना वेग

रखडलेला रस्ता, उठलेला सवाल!

रखडलेल्या रस्त्याने उघड केला प्रशासनाचा निष्काळजी कारभार!

आमदार सिद्धार्थ खरात थेट घटनास्थळी, अधिकारी ‘धारेवर’; आंदोलनाच्या इशाऱ्याने हलली राजकीय यंत्रणा

डोणगाव ते आरेगाव हा महत्त्वाचा मार्ग गेल्या वर्षभरापासून रखडला असून वाहनचालक आणि ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्षच केले. अखेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे यांनी ठणकावून निवेदन दिले आणि मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला.

या इशाऱ्यामुळे अखेर प्रशासन व राजकीय यंत्रणा जागी झाली. अधिकारी रस्त्यावर उतरले, पाहणी झाली आणि चार ते पाच दिवसात काम सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र एवढ्यावरच न थांबता, मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. पण या सगळ्या गदारोळात एक मोठा प्रश्न उभा राहतो — ‘या रस्त्याचं काम निधीअभावी बंद असल्याचं समजल्यावर आता नेमकं काय होणार?’ डोणगाव व आरेगावचे ग्रामस्थ पुन्हा एकदा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भरडले जात आहेत. आश्वासनांची राख होणार की प्रत्यक्षात रस्ता तयार होणार, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Post Top Ad

-->