आरेगाव ते डोणगाव रस्त्याच्या खड्डे बुजवण्याला सुरुवात – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हालले - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, September 4, 2025

आरेगाव ते डोणगाव रस्त्याच्या खड्डे बुजवण्याला सुरुवात – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हालले

बुलढाणा डोणगाव– गेल्या एक ते दीड वर्षांपासून रखडलेल्या आरेगाव ते डोणगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करूनही काहीच हालचाल होत नव्हती.

मात्र अखेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल खाडे यांनी या प्रश्नावर ठाम भूमिका घेत, आंदोलनाचा इशारा दिला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन जागे झाले आणि तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली.

त्यानंतर आजपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या हे काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. तरीही नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे की, निदान सुरुवात तरी झाली.

गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले होते. ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वापरणाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.नागरिकांचे संयम आता संपत चालले होते. वेळेवर रस्ता पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू," असा स्पष्ट इशारा खाडे यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या हे विशेष.मात्र एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे – या रस्त्याचे संपूर्ण काम नेमके कधी पूर्ण होणार?कारण सध्या फक्त खड्डे बुजवण्याचे काम चालू असून, रस्त्याच्या संपूर्ण मजबुतीकरणासाठी अजून कोणतीही ठोस तारीख देण्यात आलेली नाही. नागरिकांची मागणी:रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावेअपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावीपावसाळ्याच्या आधी कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात

Post Top Ad

-->