WASHIM | समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या वॅक्सीन chori करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांकडून atak - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 9, 2025

WASHIM | समृद्धी महामार्गावर अडीच कोटींच्या वॅक्सीन chori करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांकडून atak


वाशिम समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनर मधून तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या वॅक्सीनची रॉबरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली असून  त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर  चोरी गेलेल्या वॅक्सीनचा मात्र अजूनही शोध घेतला जातोय. या गुंन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलीये.

भिवंडी येथून नागपूर मार्गे कोलकत्ता इथं डिलिव्हरीसाठी निघालेल्या कंटेनर (MH04JK7054) मधील ४६ बॉक्स औषधं अज्ञात चोरट्यांनी २३ जुलै रोजी चालत्या गाडीतून लॉक कापून चोरली होती. या संदर्भात कंपनीने तक्रार दिल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू करत. तब्बल ८५ हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला. त्यानंतर हे आरोपी गोवा येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरी साठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून चार आरोपींना अटक केली तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत घुडावद यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.

कारवाईदरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक व स्कॉर्पिओसह ३८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचं कबूल केलं आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच 11 गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत देखील यांच्यावर कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.



Post Top Ad

-->