डोणगाव-:रस्त्यावरील गर्दीत, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून…एक गाडी जात होती – आयशर क्रमांक MH 19 CY 7931.” त्या गाडीत १५ गायी कोंबून भरल्या होत्या. जीवघेणी घुसमट… पाण्याचा थेंब नाही, जागा नाही, मोकळा श्वास नाही.” आणि या अमानवी तस्करीत… एका गायीचा मृत्यू झाला – शांत नाही, तर तडफडत!”कुणी ऐकलं तिचं ओरडणं? नाही… पोलीस गप्प होते… रस्ता मोकळा होता… आणि माणुसकी हरवलेली होती.”गौरक्षकांची भूमिका… समाजाचं जागं मन बजरंग दलाचे कार्यकर्ते – कृष्णा बकाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गाडी थांबवली. पोलीसांना बोलावलं, आणि गाडीत पाहिलं… तिथं मृत गाईचा देह होता… आणि श्वास घेण्यास तडफडणाऱ्या १४ इतर गायी. एक वासरू… डोळ्यांतून भीती वाहत होती. गाडीमध्ये वायुप्रवाह नाही, पाणी नाही, जागा नाही. एक गाय गेली… पण अंत्यसंस्काराने माणुसकी जिवंत! त्या मरण पावलेल्या गायीवर… फक्त चादर नाही टाकली…तिचा सन्मान केला गेला. डोणगावच्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले – मंत्र, दीप, आणि मौनस्मरण करत.”अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते… आणि ओठांवर एकच वाक्य…गाय गेली, पण तिने आपल्याला जागं केलं.’”कायदेशीर कारवाई – पण समाज कुठं उभा राहणार?या प्रकरणात प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे. परंतु… ही कारवाई मरणानंतरच का? कायदे घटना घडून गेल्यावरच आठवायचे का?”प्रश्न आहे – जर पोलीस स्टेशन जवळचं असेल, तरी ही गाडी कसकाय सुटली?” कुणाचं दुर्लक्ष? आणि तेच माणूसकीचं अपयश नाही का?”समाजाला जागं होण्याची वेळ आली आहे! गायींना आपण देव मानतो… पण त्यांची तडफड आपल्याला हलवत नसेल,तर आपण कोणत्या धर्माच्या, कोणत्या माणुसकीच्या बोल करतो?”आज गोरक्षण केवळ घोषणा नको… कृतीतून माणुसकी दाखवा!”गायींचा टाहो... पोलिसांचं मौन! १५ गायींची तस्करी, एक गाय मृत!माणुसकी हरवली… समाज जागा!बजरंग दलाच्या हस्तक्षेपाने गोरक्षा!मृत गोमातेसह सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारकायदा आहे… पण अंमलबजावणी कुठे?
गायींचा टाहो… पोलीस गप्प… समाज जागा! त्या गाडीतून कुणाचा टाहो येत होता…?”