MUMBAI | मुंबई लोकलमध्ये भीषण अपघात; गर्दीतून ढकलल्याने एमएसएफ जवानाचा मृत्यू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, October 4, 2025

MUMBAI | मुंबई लोकलमध्ये भीषण अपघात; गर्दीतून ढकलल्याने एमएसएफ जवानाचा मृत्यू

मुंबई :शुक्रवारी संध्याकाळी मीरा रोड आणि भायंदर स्थानकादरम्यान झालेल्या एका दुर्दैवी अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलातील (MSF) जवान गणेश जगदाळे (वय 31) यांचा मृत्यू झाला. 
शेतातलं सोयाबीन वाहून गेलं… डोळ्यातलं पाणी मात्र उरलं! – ७ हजारांची थट्टा की मदत?"🔴

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश जगदाळे हे दहिसर स्थानकातून नायगावकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करत होते. ट्रेनमध्ये अत्यंत गर्दी असल्याने झालेल्या धक्काबुक्कीमध्ये त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या ट्रेनमधून खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत जवान गणेश जगदाळे हे दहिसर सिटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढी
ल तपास सुरू केला आहे.

Post Top Ad

-->